स्वप्न साकार झालं! ‘इंद्रायणी’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्याने घेतली नवीन कार; म्हणाला…
मराठी टेलिव्हिजनवरील 'इंद्रायणी' मालिकेत अधोक्षजची भूमिका साकारणारा लोकप्रिय अभिनेता निशांत पवारने नुकतीच नवीन टाटा नेक्सन गाडी खरेदी केली आहे. त्याने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या आनंदाचा क्षण चाहत्यांबरोबर साजरा केला. निशांतने आपल्या मेहनतीच्या कमाईतून ही गाडी घेतली असून, त्याच्या कुटुंबीयांनी गाडीची पूजा केली. चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.