अली गोनीबरोबरच्या नात्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना जास्मीन भसीनचं रोखठोक उत्तर, म्हणाली…
टेलीव्हिजनवरील लोकप्रिय जोडपे अली गोनी आणि जास्मीन भसीन 'बिग बॉस' १४ मध्ये भेटले आणि त्यांचं रिलेशनशिप सुरु झालं. काही वर्षांच्या डेटिंगनंतर ते लिव्ह-इनमध्ये राहायला लागले. जास्मीनने अलीबरोबरच्या नात्याबद्दल आणि धर्मावरुन ट्रोल करणाऱ्या लोकांबद्दल जास्मीनने सांगितलं की, आम्ही जसे आहोत तसे एकमेकांना स्वीकारले आहे. त्यामुळे आम्हाला कोणाचंही मत महत्त्वाचं नाही. आमच्या नात्याबद्दल जर लोक नकारात्मक मतं व्यक्त करत असतील, तर त्यांना लाज वाटली पाहिजे.