‘जाऊ बाई गावात’ची विजेती रमशा फारुकी झळकली CID मालिकेत, दयाबरोबर फोटो शेअर करत म्हणाली…
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जाऊ बाई गावात’ हा रिअॅलिटी शो चांगलाच गाजला होता. या अफलातून संकल्पना असलेल्या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन हार्दिक जोशीने केलं होतं. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘जाऊ बाई गावात’च्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. तीन महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर रमशा फारुकीने बाजी मारून ‘जाऊ बाई गावात’ ट्रॉफीवर नाव कोरलं. रमशाला २० लाखांचा धनादेश आणि ट्रॉफी देण्यात आली होती. हीच रमशा नुकतीच सीआयडी (CID) मालिकेत झळकली.