आर्थिक फसवणूक प्रकरणी अटक झाल्याच्या अनेक महिन्यांनंतर जय दुधाणेची पोस्ट
जय दुधाणेला काही महिन्यांपूर्वी मुंबई विमानतळावर ४.६१ कोटी रुपयांच्या रिअल इस्टेट घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अलीकडेच त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांबद्दल रोष व्यक्त केला. त्याने कठीण काळात साथ दिल्याबद्दल बायको हर्षला पाटीलचे आभार मानले. जयने इन्स्टाग्रामवर स्टोरी आणि पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली.