“…नायिका उधळून लावणार खलनायिकांचा कट”, सायलीने घेतला खास उखाणा, म्हणाली…
'स्टार प्रवाह'वर वटपौर्णिमानिमित्त "महानायिकांची महावटपौर्णिमा" हा विशेष भाग दाखवला जाणार आहे. यात वाहिनीवरील विविध मालिकेतील नायिका आणि नायक एकत्र येऊन खलनायिकांचा कट उधळूण लावणार आहेत. जुई गडकरीने सायलीच्या भूमिकेत पारंपरिक अंदाजात उखाणा घेतला आहे. या विशेष भागात नायक-नायिका मिळून खलनायिकांना धडा शिकवणार आहेत. हा भाग रविवार दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता पाहता येईल.