‘ती जागा सुरक्षित नव्हती, मला भीती…’, थायलंडमध्ये मध्यरात्री हरवली होती जुई गडकरी
हल्ली सोलो ट्रेव्हलिंग चर्चेत आहे. अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या पहिल्या सोलो ट्रीपचा अनुभव शेअर केला आहे. थायलंडमध्ये मध्यरात्री अडीच वाजता ती हरवली होती, पण फोनमधील फोटोंच्या मदतीने हॉटेलवर पोहोचली. तिने शांतपणे मार्ग शोधल्याने ती सुरक्षित परतली. जुईने प्रवासाची आवड तिच्या पालकांमुळे निर्माण झाल्याचे सांगितले. ती निसर्गाच्या सानिध्यात तासंतास बसू शकते.