‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्रीने जुळ्यांना दिला जन्म, व्हिडीओमध्ये दाखवली बाळांची झलक
लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘कुंडली भाग्य’ फेम श्रद्धा आर्या आई झाली आहे. तिने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. श्रद्धाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही बातमी शेअर केली आहे. तिच्या पती राहुल नागलसोबत ती लग्नाच्या तीन वर्षांनंतर आई-बाबा झाली आहे. श्रद्धाने व्हिडीओ शेअर करून बाळांचा जन्म २९ नोव्हेंबर रोजी झाल्याचे सांगितले. अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे.