कुमार सानूंबरोबरचा फेक फोटो पाहून भडकली कुनिका सदानंद; संताप्त पोस्ट शेअर करत म्हणाली…
कुनिका सदानंद एआय तंत्रज्ञानामुळे संतापली आहे. एआयने बनवलेल्या बनावट फोटोमुळे तिची आणि गायक कुमार सानू यांची प्रतिमा मलिन होत असल्याचे तिने म्हटले आहे. कुनिकाने हा फोटो त्वरित हटवण्याची मागणी केली असून, तसे न केल्यास मानहानीचा खटला भरण्याची धमकी दिली आहे. तिने सोशल मीडियावर संतापजनक पोस्ट शेअर करून व्यक्तिमत्व हक्कांचे उल्लंघन थांबवण्याचे आवाहन केले आहे.