“आम्ही अनेक वर्षांपासून वेगळे…”, संजीव सेठपासून विभक्त झाल्यानंतर लता सभरवाल यांचा खुलासा
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री लता सभरवाल यांनी पती संजीव सेठपासून विभक्त होण्याच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की हा निर्णय परस्पर संमतीने घेतला होता. लता म्हणाल्या की, अनेक वर्षांपासून ते वेगळे राहत होते आणि वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय घेतला. पत्रकारांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.