भारती सिंगने पहिल्यांदाच दाखवला लाडक्या ‘काजू’चा चेहरा, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
लोकप्रिय अभिनेत्री भारती सिंगने तिच्या दुसऱ्या मुलाचा चेहरा पहिल्यांदाच सोशल मीडियावर दाखवला आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तिने युट्यूबवर व्हिडीओ शेअर करत मुलाचा चेहरा उघड केला. या व्हिडीओला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. भारती आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांनी २०१७ मध्ये लग्न केले आणि २०२२ व २०२५ मध्ये दोन मुलांना जन्म दिला.