‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्याची नवी सुरुवात, सुरू केला स्वत:चा फूड स्टॉल
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेता दत्तू मोरेने अभिनयाबरोबरच व्यवसायातही पाऊल ठेवले आहे. त्याने ठाण्यात 'डेली बाऊल' नावाने क्लाऊड किचन सुरू केले आहे. या उपक्रमाद्वारे पौष्टिक, संतुलित आणि घरगुती चवीचे हेल्दी फूड देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. सोशल मीडियावर त्याच्या या नव्या उपक्रमाचे कौतुक होत आहे आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.