‘ठिव फोन’ म्हणणारे मामंजी अखेर हास्यजत्रेच्या मंचावर येणार, कोण आहेत वनीचे धनी? पाहा Video
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमात 'सून सासू सून' या लोकप्रिय स्किटमध्ये मामंजीची नवीन एन्ट्री होणार आहे. आजवर फक्त आवाजाद्वारे दाखवलेले मामंजी आता प्रत्यक्ष मंचावर येणार आहेत. सचिन गोस्वामी मामंजीच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही विशेष एन्ट्री या बुधवारी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईल.