महेश मांजरेकरांचा ‘देवमाणूस’ चित्रपट घरबसल्या पाहता येणार; कधी व कुठे पहाल?
महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'देवमाणूस' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता आणि ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता झी टॉकीजवर होणार आहे. महेश मांजरेकर एका वारकऱ्याच्या भूमिकेत असून, चित्रपटाची कथा केशव भाऊभोवती फिरते. लव फिल्म्सने निर्मिती केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले आहे.