“तू परत टेलीव्हिजनवर काम करणार नाहीस का?” अजिंक्य राऊतला चाहत्याचा प्रश्न; म्हणाला…
लोकप्रिय मराठी अभिनेता अजिंक्य राऊतला चाहत्यांनी त्याच्या टीव्हीवरील कमबॅकबद्दल प्रश्न विचारला. इन्स्टाग्रामवरील 'आस्क मी सेशन'मध्ये अजिंक्यने सांगितले की, यावर्षी त्याने टेलीव्हिजनवर काम करण्याचा विचार केला नाही. भविष्यात त्याला राजपुत्र किंवा विचारशील व्यक्तिमत्त्व असलेल्या भूमिकेत काम करायची इच्छा आहे. अजिंक्य लवकरच 'अभंग तुकाराम' या चित्रपटात दिसणार आहे.