“जितकं आपण या अभिनेत्रीला…”, चिन्मय मांडलेकरने निवेदिता सराफांचं कौतुक करत केली खंत व्यक्त
अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता चिन्मय मांडलेकर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या नव्या मालिकेत अभिनेता म्हणून नाही तर लेखकाची धुरा सांभाळत आहे. २ डिसेंबरपासून ही नवी मालिका दुपारी २.३० वाजता प्रसारित होतं आहे. त्यानिमित्ताने नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. यावेळी चिन्मय मांडलेकरने निवेदिता सराफ यांच्या कामाबद्दल भरभरून कौतुक करत एक खंत व्यक्त केली. तो नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या…