“देवेंद्रजी आपल्या देशाचे ‘पहिले मराठी पंतप्रधान’ होतील”, फडणवीसांबद्दल असं कोण म्हणालं?
राज्यात २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आणि २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाले. महायुतीला बहुमत मिळाले, तर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अभिनेता अभिजीत केळकरने फडणवीस यांचे अभिनंदन करताना त्यांना देशाचे पहिले मराठी पंतप्रधान होण्याची शुभेच्छा दिली. प्रवीण तरडे यांनीही फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांचे अभिनंदन केले.