“नवरा म्हातारा झालाय अन्…”, ट्रोलरला ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “हिंदू राष्ट्राची लाज…”
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. एका नेटकऱ्याने त्यांच्या पतीच्या वयावरून त्यांना ट्रोल केले होते, त्यावर ऐश्वर्याने "हिंदू राष्ट्राची लाज राखा" असे उत्तर दिले. ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रिय असून, आपल्या फिटनेस आणि प्रोजेक्ट्सबद्दल माहिती शेअर करतात. त्यांनी अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.