अमृता देशमुखचं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर झालं ‘असं’ स्वागत, म्हणाली…
नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये अमृता देशमुखने आपल्या दमदार अभिनयाने स्वतंत्र्य स्थान निर्माण केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात अमृताने जबरदस्त खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकली. अमृता अभिनयाबरोबर उत्कृष्ट आरजे आहे. ‘पुण्याची टॉकरवडी’ म्हणून तिला ओळखलं जातं. आता हीच टॉकरवडी खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या पर्वात अमृता पाहायला मिळणार आहे. तिचं हास्यजत्रेच्या कलाकारांनी कसं स्वागत केलं? जाणून घ्या…