अभिनेत्रीने थायलंडच्या व्यक्तीला शिकवलं मराठी, मालिकेतला डायलॉग म्हणायला सांगितला
मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकरने थायलंडमधील तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती थायलंडच्या टॅक्सी चालकाशी मराठीत संवाद साधते आणि त्याला 'डोस्क्यात काय फॉल्ट हाय काय…' हा मराठी डायलॉग म्हणायला लावते. तिने थायलंडची भाषा शिकण्याचा प्रयत्नही केला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून तिच्या या प्रयत्नाचे कौतुक होत आहे.