“लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Kishori Shahane Dance: ९०च्या दशकात मराठी सिनेसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि जबरदस्त नृत्य कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या किशोरी शहाणे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नेहमी सुंदर फोटो, डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. तसंच सोशल मीडियावर ट्रेंड देखील फॉलो करताना दिसतात. नुकताच किशोरी शहाणे यांनी एक एनर्जेटिक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. हा डान्स व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांचं भरभरून कौतुक करत आहेत.