“तेव्हा मी खूप घाबरले”, मराठी अभिनेत्रीने सांगितला नोकरीमधला वाईट अनुभव; म्हणाली…
कलाविश्वात काम करताना अनेक अभिनेत्री वाईट प्रसंगांना सामोऱ्या जातात. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील शालिनी म्हणजेच माधवी निमकरने तिच्या नोकरीतील वाईट अनुभव शेअर केला. सुरुवातीला आर्थिक अडचणींमुळे तिने एका ठिकाणी नोकरी केली. पण तिथे तिला वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले. याबद्दल तिने म्हटलं, "ज्यावेळी मला त्या माणसाच्या स्पर्शामध्ये कळलं; तेव्हा मी खूप घाबरले. मी तेव्हा ठरवलं की, मला ही नोकरी करायची नाही आणि ती नोकरी सोडली."