स्टार प्रवाहच्या ‘या’ मालिकेत काम मिळाल्यावर मराठी अभिनेत्रीने सातारा सोडलं, पाहा Photos
मराठी अभिनेत्री माधुरी पवार हिने 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेसाठी मुंबईत शिफ्ट होण्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. साताऱ्यात जन्मलेली आणि तिथेच वाढलेली माधुरी आता मुंबईत राहणार आहे. 'रानबाजार' वेब सीरिजमधील प्रेरणा पाटीलच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेली माधुरी, 'देव माणूस' आणि 'तुझ्यात जीव रंगला' मालिकांमुळे लोकप्रिय झाली आहे. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.