कुर्यात सदा मंगलम! मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, नवराही आहे लोकप्रिय अभिनेता
मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नसराई सुरु आहे. 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेतील अभिनेत्री साक्षी महाजनने अभिनेता अथर्व कर्वेसोबत लग्न केले. साक्षीने नऊवारी साडी आणि अथर्वने कुर्ता-धोतर असा खास लुक केला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांची पहिली भेट 'विठू माऊली' मालिकेच्या सेटवर झाली होती आणि ७ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न केले.