“ओव्हरअॅक्टींग, हिला कुणी घेतलं?”, ट्रोल करणाऱ्यांना विशाखा सुभेदारांचं उत्तर; म्हणाल्या…
अलीकडे सोशल मीडियावर ट्रोलिंगचं प्रमाण वाढलं आहे, ज्याचा कलाकारांना जास्त त्रास होतो. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी ट्रोलर्सबद्दल एक पद्यात्मक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ट्रोलिंगमुळे कलाकारांना होणाऱ्या वेदना व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी या पोस्टला समर्थन दिलं असून काहींनी त्यांना ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे.