“याचसाठी टॅक्स भरतो का?”, मुलुंडमधील ब्रिज दुर्घटनेवर संतापली मराठी अभिनेत्री; म्हणाली…
१४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुलुंड (पश्चिम) येथे मेट्रो लाइन ४ च्या बांधकामादरम्यान काँक्रीटचा भाग कोसळून एकाचा मृत्यू व तीन जण जखमी झाले. या घटनेवर मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. तिने जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली असून, नागरिकांच्या सुरक्षेची हमी देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तिच्या पोस्टला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे.