Video : “ज्या शाळेत मतदान केलं…”, शशांक केतकरचा व्हिडीओ चर्चेत; म्हणाला, “कुणीही निवडून…”
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. मराठी अभिनेता शशांक केतकरने मतदान केल्यानंतर शाळेबाहेर कचरा पाहून व्हिडीओ शेअर केला. शशांकने सोशल मीडियावर स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. त्याने म्हटले की, कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून आला तरी स्वच्छतेसाठी कोणीही पुढाकार घेणार नाही. शशांकच्या या पोस्टचे चाहते कौतुक करत आहेत.