९ वर्षांचे करिअर अन् फक्त एकच हिट चित्रपट, तरीही कोटींमध्ये फी घेतो अभिनेता
सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी यांचा धाकटा मुलगा अखिल अक्किनेनी, ९ वर्षांच्या करिअरमध्ये फक्त एक हिट चित्रपट देऊ शकला आहे. १९९४ मध्ये अमेरिकेत जन्मलेला अखिल, नागा चैतन्यचा सावत्र भाऊ आहे. त्याने २०१५ मध्ये 'अखिल' चित्रपटातून पदार्पण केले, पण तो फ्लॉप ठरला. 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' हा त्याचा एकमेव हिट चित्रपट आहे. तरीही तो एका चित्रपटासाठी सात कोटी रुपये मानधन घेतो.