‘नवरी मिळे हिटलरला’फेम अभिनेत्रीची भूतान ट्रीप, पाहा अभिनेत्रीचे खास फोटो
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेने दीड वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मालिकेतील लीलाच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आलापिनी निसळ मालिका संपल्यानंतर भूतानला फिरायला गेली आहे. तिने इन्स्टाग्रामवर भूतानमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत. 'नवरी मिळे हिटलरला' ही आलापिनीची पहिलीच मालिका होती आणि तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अभिनयाव्यतिरिक्त तिला नृत्य व गायनाची आवड आहे.