‘नवरी मिळे…’मधील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ( Navri Mile Hitlerla ) मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र आता घराघरात पोहोचलं आहे. एजे ( अभिराम ) आणि लीलाचं लग्न झाल्यापासून मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला मालिकेतील कलाकारांच्या एका डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.