निखिल बने पोहोचला पूजा सावंतच्या गावी, दाखवली कोकणातल्या घराची खास झलक; पाहा Video
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील विनोदी कलाकार निखिल बने सध्या कोकणात बाईकवर सोलो राईड करत आहे. त्याने नुकतीच अभिनेत्री पूजा सावंतच्या कोकणातील घरी भेट दिली. निखिलने पूजाला भेटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पूजाने निखिलच्या भेटीला गोड सरप्राइज म्हटले. निखिल आणि पूजाच्या चाहत्यांनी या व्हिडीओला चांगला प्रतिसाद दिला आहे.