‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट, भावुक होत म्हणाली…
‘कलर्स मराठी’वरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेत अभिनेत्री अमृता रावराणेने साकारलेली मंजुषा ही नकारात्मक भूमिका संपली आहे. वल्लरीने कोर्टात मुलींच्या अपहरणाची केस लढल्यानंतर मंजुषाची खरी बाजू समोर आली आणि तिला शिक्षा सुनावली गेली. अमृताने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत मालिकेच्या टीमचे आभार मानले आहेत. मंजुषा हे पात्र कमी दिवसांत प्रेक्षकांच्या मनावर ठसले होते.