‘प्रेमाची गोष्ट’ फेम स्वरदा ठिगळेने लग्नाचा पहिला वाढदिवस ‘असा’ केला साजरा, पाहा फोटो
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट’. ही मालिका दीड वर्षापासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करीत आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. तसेच मुक्ता, सागर, सई, सावनी, इंद्रा, कोमल, स्वाती, मिहीर अशा मालिकेतील सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांना मनात एक वेगळं घर निर्माण केलं आहे. नुकताच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदा ठिगळेच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. स्वरदानं लग्नाचा पहिला वाढदिवस गोव्यामध्ये पतीबरोबर साजरा केला.