“मला १० हजार पाठव, माझी गर्लफ्रेंड…”, तेजश्रीच्या ऑनस्क्रीन भावाला चाहात्याचा मॅसेज
हल्ली सोशल मीडियामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांशी थेट संपर्क साधणं सोपं झालं आहे. परंतु, यामुळे कलाकारांना ट्रॉलिंगचा सामना करावा लागतो आणि त्यांना विचित्र मॅसेजेसही येतात. मराठी अभिनेता राज मोरेला असाच एक विचित्र मॅसेज आला ज्यात एका चाहतीच्या प्रियकराने त्याला दहा हजार रुपये मागितले. राजने गमतीशीर प्रतिक्रिया देत यूपीआय मागितला. राज मोरेने कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.