२५ अंडी आणि दीड किलो चिकन, राकेश बापटचा डाएट प्लॅन ऐकून व्हाल थक्क; म्हणाला…
अभिनेता राकेश बापटने त्याच्या फिटनेसबद्दल माहिती दिली आहे. 'बिग बॉस मराठी' फेम राकेशने सांगितले की, मिस्टर इंडियासाठी निवड झाल्यावर तो रोज व्यायाम करत असे आणि दिवसाला २५ अंडी व दीड किलो चिकन खायचा. सकाळी चार वाजता उठून दहापर्यंत व्यायाम करायचा. त्याने नैसर्गिकरित्या बॉडी बनवली. राकेशने 'तुम बिन' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि 'नवरी मिळे हिटलर' मालिकेतून मराठी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला.