“आम्ही मुलांचा विचार…”, राकेश-रिद्धीने ‘या’ कारणामुळे घेतलेला मूल न होऊ देण्याचा निर्णय
अभिनेता राकेश बापट 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाचा उपविजेता ठरला. अशातच आता 'बिग बॉस'च्या घराबाहेर आल्यानंतर त्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. राकेश व त्याची एक्स पत्नी रिद्धी डोगरा विभक्त झाले असले तरी चांगले मित्र आहेत. घटस्फोटाबद्दल राकेश म्हणाला की, वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी मैत्री टिकवण्यासाठी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पालकत्वाबद्दल राकेशने सांगितलं की, करिअरमुळे मुलांचा विचार केला नाही.