“मला आणि निवेदिताला एक चांगली मैत्रीण मिळाली”, रसिका वाखारकरचं अशोक सराफांकडून कौतुक
लोकप्रिय अभिनेत्री रसिका वाखारकरने नुकतेच शुभांकर उंब्राणीसोबत लग्न केले. या लग्नात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता उपस्थित होते. रसिकाच्या लग्नाचे खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशोक सराफ यांनी रसिकाचे कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या. रसिकाने हिरव्या नऊवारी साडी तर शुभांकरने पांढरा कुर्ता परिधान केला होता. चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.