ऋषभ शेट्टीचा जगभर गाजलेला ‘कांतारा चॅप्टर 1’ मराठीत पाहता येणार, कधी व कुठे बघायचा?
ऋषभ शेट्टीच्या अभिनय आणि दिग्दर्शनात साकारलेला ‘कांतारा चॅप्टर १’ हा ब्लॉकबस्टर सिनेमा २ ऑक्टोबर रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि नंतर ओटीटीवरही रिलीज झाला. आता हा सिनेमा झी मराठीवर ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता मराठीत पाहता येणार आहे. ‘कांतारा चॅप्टर १’ने जगभरात ८५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.