Video : साईराज केंद्रेने शेअर केला ‘सावळ्याची जणू सावली’च्या सेटवरील व्हिडीओ; म्हणाला…
साईराज केंद्रे हा मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय बालकलाकार आहे. सध्या तो 'झी मराठी'वरील 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत अबीरची भूमिका साकारत आहे. त्याच्या अभिनयाचं आणि सोशल मीडियावरील व्हिडीओंचं प्रेक्षकांमध्ये खूप कौतुक होत असतं. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो रात्री १ वाजता शूटिंग करताना दिसतोय. मालिकेत सावली आणि सारंग यांच्या मुलांच्या प्रयत्नांमुळे रंजक वळण येणार आहे.