छातीत दुखू लागल्याने स्टेजवरच पडला सलमान खान; ‘बिग बॉस’च्या प्रोमोवर दिले स्पष्टीकरण
बिग बॉसचा नवा प्रोमो आला असून, ज्यामध्ये अचानक सलमानच्या छातीत दुखत असल्याचे दाखवल्याने चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. यावर सलमान खानने स्पष्टीकरण देत लिहिले, "देवाच्या कृपेने मी पूर्णपणे बरा असून, मला कोणताही त्रास झालेला नाही. बिग बॉसचा प्रोमो ज्या प्रकारे कट करून बनवण्यात आला, तसा तो करायला नको होता. कारण- त्यामुळे पूर्ण गोष्टीचा अर्थच बदलला आणि असं वाटतंय की, मी घरात काझीनं जे केलं, अगदी तसंच करीत आहे. मात्र, हा त्रास होत असल्याचे जे मी दाखवले, ते काझीला त्याची चूक दाखवून देण्यासाठी होते."