संकेत पाठक-सुपर्णा श्याम झाले आई-बाबा; लेकाचा पहिला फोटो शेअर करत म्हणाले…
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या मुलाच्या जन्माची आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. सुपर्णाने इन्स्टाग्रामवर मुलाचा फोटो शेअर करत "ह्या वर्षी साक्षात गणपती आमच्या घरी आले" अशी कॅप्शन दिली आहे. मराठी इंडस्ट्रीतील कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.