“जज करणारे तुम्ही कोण?”, ट्रोल करणाऱ्याला ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्रीने सुनावलं
मराठी अभिनेत्री मानसी सुरेशला सोशल मीडियावर कपड्यांवरून ट्रोल करण्यात आले. एका नेटकऱ्याने तिच्या फोटोवर नकारात्मक कमेंट केली. मानसीने त्याला सडेतोड उत्तर देत म्हटले की, "कपड्यांवरून मुलींना जज करू नका." तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर नेटकऱ्याच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि मुलींना त्यांच्या कपड्यांबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. मानसी सध्या 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत काम करत आहे.