Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम वीणा जगतापने मेघा धाडेला दिवाळीनिमित्ताने दिलं खास गिफ्ट
दोन महिन्यांपूर्वीच ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘सावळ्याची जणू सावली’ ही नवी मालिका सुरू झाली. अवघ्या काही दिवसांत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा घराघरात पोहोचल्या आहेत. ‘सावळ्याची जणू सावली’मधील ऐश्वर्या मेहेंदळे म्हणजे वीणा जगतापने भैरवी वझे म्हणजे मेघा धाडेला दिवाळीनिमित्ताने खास गिफ्ट दिलं आहे; ज्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.