“वडिलांच्या निधनानंतर कुटुंब आणि बहीणींशी नातं तुटलं”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख
मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री सीमा घोगळेने तिच्या वडिलांच्या निधनानंतरच्या काही दु:खद आठवणी शेअर केल्या आहेत. वडिलांच्या अंत्यसंस्काराचा निर्णय तिने स्वतः घेतला, ज्यामुळे तिचे कुटुंबीयांशी मतभेद झाले. तसंच वडिलांच्या निधनानंतर कुटुंबातील नातेवाईक आणि बहिणी तिच्यापासून दुरावल्या. आईच्या निधनानंतर तिघी बहिणी एकमेकींशी संपर्कात नाहीत. सीमाने या अनुभवांमुळे कुटुंबातील ताणतणावांबद्दल तिचं मत व्यक्त केलं.