‘शिवा’ फेम मराठी अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला लग्नातील फोटो
मराठी अभिनेता शाल्व किंजवडेकरने गर्लफ्रेंड श्रेया डफळापूरकरशी लग्न केलं. सिद्धार्थ चांदेकरने त्यांच्या लग्नातील फोटो शेअर केला. शाल्व व श्रेया दोघेही लग्नात लाल पोषाखात सुंदर दिसत होते. त्यांनी मेहंदी व हळदी समारंभाचे फोटोही शेअर केले होते. गेल्या वर्षी साखरपुडा झाल्यानंतर चाहत्यांमध्ये त्यांच्या लग्नाबद्दल उत्सुकता होती. अखेर त्यांच्या लग्नावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.