‘शुभ श्रावणी’ मालिकेमधील अभिनेत्री किती शिकलीय माहितीय? ‘या’ कॉलेजमधून घेतलंय शिक्षण
'शुभ श्रावणी' ही मालिका झी मराठीवर सुरू झाली असून यात वल्लरी विराज आणि सानिका काशिकर मुख्य भूमिकेत आहेत. सानिका 'मोक्षा'ची भूमिका साकारत आहे. तिने 'नवरी मिळे हिटलरला', 'मन झाला बाजिंद' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच तिने इंटेरिअर डिझाइनचं शिक्षण घेतलं आहे. सानिकाला संगीताचीही आवड आहे आणि ती संगीतकारांच्या कुटुंबात वाढली आहे.