अभिनेता गुरुचरण सिंगवर कर्जाचा डोंगर, काम मिळेना अन् ३४ दिवसांपासून अन्न…
'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंग दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला होता आणि २६ दिवसांनी परत आला. त्याच्यावर १.२ कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि ते फेडण्यासाठी तो मुंबईत काम शोधत आहे. गुरुचरणने सांगितलं की, त्याला पैशांची खूप गरज आहे कारण त्याला ईएमआय आणि क्रेडिट कार्डची बिलं भरावी लागतात. त्याला वृद्ध आई-वडिलांची काळजीही घ्यायची आहे.