“कदाचित परत…”, अखेर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये परतणार दया? सहकलाकार म्हणाले…
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील ‘अब्दुल’ची भूमिका साकारणारे शरद संकला यांनी दिशा वकानीच्या पुनरागमनाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, दिशा वकानी परत येतील की नाही, हे ठाम सांगता येत नाही. निर्माते असित मोदीही तिच्या परत येण्याची वाट पाहत आहेत. प्रेक्षकांनी त्या पात्राला खूप प्रेम दिलं आहे, त्यामुळे प्रेक्षकांची इच्छा आहे की तीच दया परत यावी.