‘ठरलं तर मग’मधील सुमन काकूला आहे कानाचा ‘हा’ गंभीर आजार; स्वत:च केलेला खुलासा
'ठरलं तर मग' ही लोकप्रिय टीव्ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल आहे. मालिकेतील सुमन काकू, म्हणजेच श्रद्धा केतकर-वर्तकने एका मुलाखतीत तिच्या कानासंबंधित आजाराबद्दल खुलासा केला. तिला टिनिटस असून गेली १७ वर्षे ती याचा सामना करत आहे. उपचार करूनही त्रास कायम राहिल्याने तिने काही काळ ब्रेक घेतला. आता ती कस्टमाइज मशीन वापरून काम करते.