‘तू ही रे माझा मितवा’मधील अभिनेत्रीची भूमिका असलेला ‘हॅप्पी पटेल’ अखेर ओटीटीवर रिलीज
आमिर खान निर्मित 'हॅप्पी पटेल : खतरनाक जासूस' हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता, परंतु फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता हा चित्रपट १ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. वीर दास मुख्य भूमिकेत असून मिथिला पालकर आणि मधुरा जोशी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा स्पाय रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे.