३७ व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्री होणार आई, जुळ्या बाळांना देणार जन्म? क्युट फोटो केला शेअर
टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती लवकरच जुळ्या मुलांची आई होणार आहे. लग्नानंतर दीड वर्षांनी तिने गरोदरपणाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. सुरभीने प्रेग्नन्सीच्या चौथ्या महिन्यात ही आनंदाची बातमी दिली होती. तिने फोटो शेअर करून चाहत्यांना अपडेट दिले. सुरभीने तिच्या पतीसोबतचा फोटो शेअर करत जूनमध्ये बाळ येणार असल्याचे सांगितले. ती सध्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत आहे.